मी कोण आहे ?
माझा जन्म महाराष्ट्रातल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात झाला. माझे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असल्याने पहिल्यापासूनच महाराष्ट्रावर आणि आपल्या लाडक्या माय मराठीवर प्रेम करते. दहावीनंतर बारावी सायन्स घेऊन पुण्याहून BE (E &TC ) केले. उच्च शिक्षण भलेही इंग्लिश भाषेत केलेले असले तरी आपली नाळ कायमच आपल्या जन्मस्थळाशी जुळलेली असते म्हणतात ना तसेच काहीस माझ्या बाबतीतही आहे.
मी ह्या ब्लॉग ची सुरवात का केली ?
पहिल्यापासूनच मला वाचनाची आवड आहे . लहानपणापासून घरी आजोबा,आजी ,आई ,वडील काहींना काही वाचत राहण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले. आजच्या डिजिटल युगातही ईबुक्स आणि epaper च्या जमान्यातही हातात पुस्तक घेऊन २ पाने चाळल्याचं समाधान मिळत नाही..असो ,पण काळानुसार आपल्यालाही बदलावेच लागते ना? म्हणून ….
मराठीत का सुरु केले ?
इंटरनेटवरील माहितीच्या मायाजालात आपल्या पाहिजे ती गोष्ट अजूनही पटकन आणि तेही आपल्या मातृभाषेत प्राप्त होणे आजच्या घडीला तरी दुर्लभच आहे ! आणि ह्याच कारणाने मुद्दाम आपल्या मराठीतच ब्लॉग सुरु करायच धाडस करत आहे.
माझा उद्देश काय आहे ?
आपला भारत देश विविध संस्कृती ,परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे ,आणि त्याला आपल्या सण आणि उत्सवांनी परिपूर्णता येते . कोणतही धार्मिक कार्यक्रम असो कि पूजा -पाठ आरती म्हटल्याशिवाय कार्य संपन्न होत नाही, तसेच आपल्या सनातन हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्ती आपापल्या इष्ट देवतेची आराधना देखील करते , त्या अनुषंगाने विविध आरत्या ,स्तोत्र ,मंत्र एकाच छताखाली मिळावे ह्या एकमेव उद्देशाने ह्या ब्लॉगचा पाया रचला गेला.